“ये तेरी मेरी कहानी”
गेले काही
दिवस आपण सर्वजण काहीतरी लिहितोय किंवा काय लिहायचा याचा विचार करतोय. आपल्याला (निदान माझ्यासारख्या नवख्यांना)
प्रोत्साहन देऊन लिहितं करणारी 'योजना' आणि तिची अंक काढायची योजना दोन्ही खूप स्तुत्य
आहेत. तर या निमित्तानेच काय लिहावं याचा खूप विचार चालला होता मनात.. माझा क्षेत्र
Finance असल्याने GST, Tax, foreign exchange अशा काही विषयांवर लिहावं कि काही घरगुती
विषय, मैत्री, नाती यावर? खूप गोंधळलेली असताना आणि हे लेखन वगैरे आपल्याला खरंच जमेल का? अशा प्रश्नांना
असताना तिचा मेसेज आला... "काहीही लिही.. तू छान लिहिशील"... आणि मग ठरवलं…
जिचा आपल्यावर इतका विश्वास आहे तिच्यासाठी लिहूया... नव्हे तिच्याबद्दलच् लिहूया..
खरंतर
योजना आणि माझी प्रथम ओळख झाली १९९७-९८ मधे छात्र
प्रबोधिनीच्या तंबूतल्या शिबिरात. आम्ही दोघी ११ वी - १२
वीत होतो. पुण्याजवळील एका खेडेगावात हे शिबीर होतं.
तंबूत
राहायचं, तेही कमीत कमी सोयिंमध्ये! एका शाळेच्या मैदानात ४-५
तंबू ठोकले होते. बाजूलाच एक मोठा डोंगर
कि टेकडी. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक छान नदी.
अतिशय निसर्गरम्य वातावरण! पण त्याचबरोबर वन्य प्राण्यांची भीती आणि प्रबोधिनीची शिस्त, असं हे एक धाडसी
शिबीर होतं. पहिल्याच दिवशी माझी आणि योजनाची मैत्री झाली. योजना आणि मी एकाच तंबूत
होतो. तिचे विचार, मुलींशी , especially लहान मुलींशी बोलण्याची पद्धत, खूपच प्रेमळ पण प्रभावी होती.
लवकरच आमचा एक छान ग्रुप
झाला. "मी, योजना, स्नेहल, संपदा, गिरीजा आणि प्रज्ञा".. पल्लवीही होती त्यात. आम्ही वेगवेगळ्या तंबूतल्या. पण असं कधी
वाटलंच नाही. आम्हाला, रोज रात्री ३-४ मुलीना,
जागरण करून राखण करायची असे. पण आम्ही सर्वच
जण रात्री जागरण करीत असू. एकमेकांसाठी. मग त्यात आकाश
निरीक्षण, गप्पा, शेकोटी, किंवा मस्ती आणि धमाल.. सगळंच केलं आम्ही. माझ्या सर्वात आठवणीतल म्हणजे आमचा "पथनाट्य". खूपच मजा आली त्या वेळी.. १०-१२ दिवसातच
ते शिबीर संपलं.. आणि एक रुखरुख लागून
राहिली..१०-१२ दिवस
खूपच कमी वाटायला लागले. आपण सर्वजण परत असे कधी भेटणार? असे वाटायला
लागलं.. आम्हाला
एकमेकींची खूप सवय झाली होती.. आणि आमची मैत्री खूप छान झाली होती..
आम्ही
सगळ्या वेगवेगळ्या शहरातल्या.. योजना धुळ्यातली तर मी मुंबईतली...
बोरिवलीतली! शिबिराच्या शेवटच्या दिवशी आम्ही पत्ते व फोन नंबर
एक्सचेन्ज केले खरे. पण मन साशंक
होत... कसा काय कॉन्टॅक्ट राहणार एकमेकींशी... शक्यच नव्हतं!.. आणि
थोड्याच दिवसात एक पत्र आलं..
धुळ्याहून.. योजनाची आणि आमची पत्रमैत्री सुरु झाली. माझ्या "आरंभ-शूर" स्वभावानुसार मीही पत्र लिहिली.. पण योजनाच्या पत्रात
सातत्य होतं... आणि तिचा पत्र-परिवारही खूप मोठा होता! तिच्या एका पत्रात मला सगळ्या मैत्रिणीं ची खुशाली कळायची.
आम्हा सगळ्या मैत्रिणींना सांधणारा तो दुवा होता... आणि
आजही आहे !
योगायोग
म्हणजे योजनाचा मामा सुद्धा बोरिवलीत राहायचा. त्यामुळे ती सुट्टीत मुंबईला
आली की आमची
नक्कीच भेट व्हायची. आमचं ते वय करिअर
ओरिएंटेड होतं... कोण काय बनणार? कोण कुठली साईड घेणार अशा विचारात आम्ही असू! योजना आर्टस् साइड्ची.. त्यातच तिला लिखाणाची आवड. त्यामुळे ती नक्की Journalism etc करेल असं
मला वाटायचं.. इतक्यातच तिचं पत्रं आलं. ती Media Related काहीतरी
course करण्यासाठी मुंबईला येणार होती. १०- १५ दिवसांसाठी!
तेंव्हा
ती काही दिवस माझ्या घरीच राहिली आणि आमच्या मैत्रीला आणखी बहर आला. माझ्या घरचीच ती एक झाली..
माझ्या आईची तर ती लाडकीचं
झाली. मी देखील एकदा
योजना बरोबर गेले होते. माझ्या आठवणीनुसार अंधेरीला "आकाशानंद" यांच्याकडे ती काहीतरी कोर्स
करत होती. तिथे योजनांचा परफॉर्मन्स बघितला आणि नक्की वाटलं कि योजना मीडिया
चॅनेल मध्ये छान काम करेल. तिनेही तेच ठरवलं होतं आणि तिचा एक Biodata देखील पाठवला होता मला.
माझा
एक मित्र, "अंबर
हडप", तेंव्हा ETV मराठी
साठी काम करत असे. त्याने एकदा मला एका टौक शो मध्ये सहभागी
व्हायला बोलावलं होतं. अनायसे योजनाचा biodata देखील देता येईल म्हणून मी गेले आणि
biodata दिला. योगायोग म्हणजे योजनेला ETV मराठी मधेच नोकरी लागली. अर्थात यात सारं श्रेय योजनाचच ! तिथेही तिची कारकीर्द खूप यशस्वी होती. माझा
ETV मराठी वारींल सर्वात आवडता प्रोग्रॅम म्हणजे "मानाचा मुजरा" ! त्यातही योजनयाचा समावेश होता हे विशेष.
यानंतर
मात्र आमचा फार काही कॉन्टॅक्ट नव्हता एकमेकांशी.. मी माझ्या कामात
busy झाले आणि योजना तिच्या कामात. तुरळक फोन, दिवाळी किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आणि लवकरच भेटूया, काहीतरी plan करूया अशा आशेवर वर्ष वर्ष गेली.. कामाच्या व्यापात इच्छा असूनही फार संपर्क राहिला नाही. माझी आईही विचारू लागली, "योजना सद्ध्या काय करते? तिचं लग्न झालं का?" आणि परत एक योगायोग अनुभवाला!
एक
दिवस योजनाचा message आला. "Hi जान्हवी, तू श्रीधर भावे
ला ओळखतेस का?"
श्रीधर
हा माझ्या काकूचा भाचा.. नातं लांबचं वाटलं तरीही वर्षातून एकदा दोनदा तरी त्याचे आई वडिल आमच्या
घरी येत असत. त्यामुळे भावे कुटुंबीयांशी अगदी घरगुती संबंध होते म्हणायला हरकत नाही. मग
योजनाने त्यांची लव्ह स्टोरी स्वविस्तर सांगितली आणि खूपच आनंद झाला. योजना आता खऱ्या अर्थाने family member झाल्यासारखं वाटलं.
लग्नानंतरही
तिने घर व काम
खूप छान सांभाळलं. काकूकडून वारंवार तिचं कौतुक ऐकत होते. विशेष म्हणजे श्रीधरच्या आजिचे तिने केलेले सांगोपन व तिला दिलेला
आधार खूपच कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे.
तिचा प्रेमळपणा, सर्वांना सामावून घेण्याचा स्वभाव आणि प्रचंड मोठा मित्रपरिवार जमवून तो टिकवून ठेवण्याची
जिद्द हे गूण घेण्यासारखे
आहेत. आजही तिने इतके वेगळे मित्र जमवून हा अनोखा उपक्रम
सुरु केला..
three cheers to our friendship योजना! बघता
बघता मी इतकं लिहू
शकले हे खरंच वाटत
नाहीये. आता नेहेमीप्रमाणे लवकरच भेटूया म्हणून हि मैत्रीकथा संपवते.
stay blessed, stay happy!
